ipad/iphonetopBanner

कहाण्या

मयूरी-बदलणारी आकृति

लेखक: सौम्या राजेंद्रन | 5th Nov, 2009


(‘‘लढाई?’’ मी विचारलं. ‘‘पोरा, आपण अशा जागी जाणार आहोत, की तिथे शेजार्‍याला खाऊन टाकणे, हे अगदी नैसर्गिक सहज समजले जाते. या जंगलात तुमचे स्वागत असो!’’ लिंबू आंबटपणे म्हणाली.)

 

आम्ही त्या भूतळाखालच्या दिशेकडे जाऊं लागलो. क्वागा मार्गदर्शक होती तर चिनी हत्ती माझ्याबरोबर एकतर्फी संवाद करीत होता. आजोबांना त्या लोकांबरोबर मी सोडले, त्याबद्दल मी अजून मनांत भेदरलो होतो, आणि म्हणून मी मधून मधून चटकन मागे पहात होतो. लौकरच, आम्ही एक प्रचंड भूभागाला लागलो. एखादे कमळ तलावांत असावे, तसा तो भाग पाण्यांत शांतपणे तरंगत होता.


माझी छाती दडपली. हेच होतं ते! कांहीही न बोलता आम्ही अनुनिर्वला येऊन पोंचलो होतो, ते मला समजलं. महासागरावर जरी हवा थंड होती, तरी माझा चेहरा गरम वाटूं लागला. पाण्याखालच्या आमच्या जागेवरुन आम्हाला झाडांची मुळें आणि लहान वाटांची सुरवात (की शेवट?) दिसत होते. त्यापैकी कांही वाटा तर इतक्या अरुंद होत्या की ती लहानशी भोकेच वाटत होती, तर कांही इतकी मोठी होती, कीं मी त्यांत रांगतरांगत सहज जाऊं शकलो असतो. पण त्या ओल्या अंधारवाटांवरती माझ्यासाठी काय वाढून ठेवलेले असेल? पाताळांतल्या नष्ट झालेल्या प्राणीजाती कोणत्या होत्या, ते मी आठवूं लागलो, पण मला एकही नांव आठवेना. सायन्सच्या वर्गात मी ह्यापूर्वीं जास्ती लक्ष द्यायला हवे होते, असे कडवटपणे वाटले.


लिंबूने पाण्यांतल्या वनस्पती बाजूला सारल्या आणि एक आ वासलेली गुहा त्यामागे लपलेली दिसली. लिंबूने आम्हाला खूण केली. ‘‘रॉबिनला मोकळे सोडा.’’ ती डायनॉसॉर भगिनींना म्हणाली. तिच्या तोंडातून एक पाण्याची लाट फुटली, आणि मी डोळेच मिटले.


एक लोखंडी दहशतीचा गोळा माझ्या पोटांत वाढायला लागला. पण रॉबिन झुरळ मात्र नेहमीसारखेच आनंदी होते. डायनॉसॉरने त्याला हळूंच गुहेच्या तोंडाशी ठेवले आणि माझ्याकडे बघून रॉबिनने मिशा हालवल्या. ‘‘असा अर्धमेला दिसूं नकोस बाळा!’’ ते ओरडले. ‘‘तू कांही आमच्याबरोबर कायम राहाणार नाहीस, यासाठी आम्ही इतके प्रयत्न करतो आहोत! निदान जराशी कृतज्ञता वाटू दे कीं!’’


गोष्‍टींविषयी

Customer Help Nos
BannerBanner