ipad/iphonetopBanner

कहाण्या

महिषासुर वध

लेखक: चंदोबा | 3rd Dec, 2009


 रंभ व करंभ दानवाचे मुलगे होते. त्यांना मुलें नव्हती, म्हणून त्यानी दीर्घकाळ तपश्चर्या केली. करंभ पंचनदीच्या तीर्थांत बुडी मारून तप करीत होता. रंभाने एका झाडावर बसून तपश्चर्या केली.


इंद्राने मगरीचे रूप घेऊन नदींत प्रवेश केला व करंभाला ठार केले. आपल्या भावाच्या मृत्यूमुळें रंभ एकदम चिडला व अग्नीला आपले मस्तक अर्पण करण्यास तयार झाला. आपले मस्तक कापण्यासाठीं जेव्हां त्याने आपली तलवार उपसली, तेव्हां अग्निदेव प्रगट झाला व म्हणाला, ‘‘तूं आत्महत्या कां करायला निघाला आहेस? त्याने काय साध्य होणार आहे? तुझ्या तपश्चर्येने मी प्रसन्न झालो आहे. सांग, तुला कोणता वर हवाय?’’


‘‘देवा, आपल्याला खरोखरच माझी दया आली असेल तर मला एक असा अजेय पुत्र द्या कीं देवता व दानवदेखील त्याला जिंकू शकणार नाहीत.’’ रंभने सांगितले.


‘‘तुझी मनीषा पूर्ण होईल.’’ असं म्हणून अग्निदेव अदृश्य झाला.


रंभ जेव्हां परत येत होता. तेव्हां त्याने एका सुंदर प्रदेशांत एक म्हैस पाहिली. हा प्रदेश यक्षांच्या स्वाधीन होता. ती म्हैस त्याच्याबरोबर पाताळांत आली.


तिथें या म्हशीचा पाठलाग करत दुसरी म्हैस आली. ते पाहून रंभ दुसर्‍या म्हशीवर नाराज झाला, व तिला त्याने खूप मारले. त्या म्हशीने रंभाला आपल्या शिंगावर घेऊन शिंगाने ठार केले. रंभाचे हे हाल पाहात ती म्हैससुद्धां त्याच्याबरोबर आगींत जळाली. त्या ज्वाळांतून दोन राक्षस प्रकट झाले. एकाचे नांव महिषी व दुसरा रक्तबीज.


राक्षसांनी महिषासुराला आपला राजा निवडले.


गोष्‍टींविषयी

Customer Help Nos
BannerBanner