ipad/iphonetopBanner

कहाण्या

परशुराम अवतार

लेखक: चांदोबा | 9th Apr, 2010


 

जमदग्नी पडला होता तो मरूनपडल्या सारखाच राहून गेला. रेणुकादेवी पतीच्या अंगावर पडून शोक करू लागली. त्याच वेळी जंगलातून आश्रमात परशुराम परत आला. घडलेले वृत्त ऐकून परशुरामने आपला परशु उचलला आणि तो वार करायला म्हणून उगारला आणि मागे वळून न पाहाता तो माहिष्मती नगराकडे धावला.त्याच वेळी भृगुमहर्षी कोठून तरी आले आणि जमदग्नी ऋषींच्या आश्रमात गेले. त्यांनी रेणुकेचे सांत्वन केले आणि आपल्या यौगिक शक्तीने जमदग्नीला जिवंत केले.


तिकडे माहिष्मती नगरीला ज्या गाईला धरून नेले होते, ती गाय आश्रमवासियांनी मागितल्यानंतर दिली, नाही म्हणून त्या गाईला सैनिक मारीत होते आणि काठीने टोचीत होते. त्याच वेळी परशुराम प्रलयकाक्ष रुद्राचा अवतार धारण केल्यासारखा संतापून आला. सैनिक त्याला पाहून पळून गेले. परशुरामाने गाईला सोडविले व आश्रमांत जा, या अर्थी तिला शिवून खूण केली. गाय सुटल्याच्या आनंदात उड्या मारीत निघून गेली.


‘‘हे नृपाधमा! संरक्षक म्हणून तू रहायला पाहिजेस, पण तू दुर्भाग्यांवर चालून येऊं लागलास तर तुला शिक्षा करणे भागच आहे! राजवाड्यांतून चल ये बाहेर!’’ कार्तवीर्याने प्रथम परशुराम कोणी सामान्य मुनिपुत्र आहे असे समजून दुर्लक्ष केले, परंतु परशुरामाचे उग्र रूप पाहून आपल्या सहस्त्र-बाहूसह तो युद्धाला सामोरा आला. कार्तवीर्यार्जुनाने ज्या ज्या अस्त्र शस्त्रांचा प्रयोग केला, त्यांचा परशुरामाने आपल्या कुर्‍हाडीने धुव्वा उडवून दिला, त्याने कार्तवीर्यार्जुनाचे सहस्त्रबाहू, झाडाच्या फांद्या कापून काढतो तसे सपासप कापून काढले. कार्तवीर्याचा देह त्या स्थितीत मृत होऊन जमिनीवर आदळला. तेव्हां त्याला तो चक्रपुरुष असल्याचे व शापमुक्त झाल्याचे आठवले. परशुराम हाच विष्णू आहे हे ओळखून त्याने त्याला मनांतल्या मनांत नमस्कार केला. त्याने आपला देह सोडला आणि तो सुदर्शन चक्रांत विलीन झाला.


गोष्‍टींविषयी

Customer Help Nos
BannerBanner